'मेरे अपने' या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा गुलजारांनी सांभाळली आहे. या सिनेमात मीना कुमारी, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा मुख्य भूमिकेत होते.
1972 मध्ये आलेल्या 'परिचय' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा गुलजारांनी सांभाळली होती.
संजीव कुमार आणि जया भादुरी अभिनीत 'कोशिश' या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन गुलजारांनी केलं आहे.
'ऑंधी' या बहुचर्चित सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन गुलजारांनी केलं असून या सिनेमात संजीव कुमार, सुचित्रा सेन, ओम प्रकाश मुख्य भूमिकेत होते.
'मौसम' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा गुलजारांनी सांभाळली आहे.
'किनारा' या रोमँटिक नाट्य असणाऱ्या सिनेमाच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा गुलजारांनी सांभाळली आहे.
'किताब' या सिनेमाचं दिग्दर्शनही गुलजारांनी केलं आहे.
'इजाजत' या सिनेमाचं दिग्दर्शन गीतकार गुलजारांनी केलं आहे.
'लिबास' या नाट्यमय सिनेमाच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा गुलजारांनी सांभाळली आहे.
गुलदारांनी दिग्दर्शित केलेला 'माचिस' हा सिनेमाही गाजला होता.