गर्भवती महिलेला वेगवेगळे पदार्थ खायला दिले जातात. तिच्या आहाराची विशेष काळजी घेतली जाते. खरंतरं, या गोष्टी गुणसुत्रांवर अबलंबून असतात. पण या उपायांमुळे बाळं गोरं जन्माला येतं, असा काहींचा समज आहे. दरम्यान भारतात असंही एक ठिकाणी आहे, जिथे गोरं बाळ जन्माला येणं अशुभ मानलं जातं. जगात असं एक ठिकाण आहे जिथे गोरं बाळ जन्माला आल्यावर क्रूरपणे बाळाची हत्या केली जाते. भारताचा केंद्रशासित प्रदेश असलेल्या अंदमान बेटावर ही क्रूर परंपरा पाळली जाते. अंदमानमधील जारवा आदिवासी जमातीच्या लोकांमध्ये आजतागायत ही क्रूर आणि विचित्र परंपरा पाळली जाते. ही जमात जगातील सर्वात जुन्या जमातींपैकी एक आहे. या समुदायामध्ये घरामध्ये गोरं बाळ जन्माला येणं अशुभ मानतात. जारवा आदिवासी जमाती ही मूळ आफ्रिकेतील मानली जाते. या जमातीतील लोकांची त्वचा काळ्या रंगाची असते. या समुदायामध्ये जर एखाद्या महिलेने गोऱ्या बाळाला जन्म दिला तर त्या बाळाला मारलं जातं. हे जन्मलेलं मूल दुसऱ्या जमातीचं असल्याचं मानलं जातं, त्यामुळे गोऱ्या नवजात बाळाची क्रूरपणे हत्या केली जाते. जारवा आदिवासी जमातीत अंधश्रद्धेची मुळे खूप खोलवर रुतली आहेत. गरोदर महिलेला प्राण्याचे रक्त पाजल्यास तिचे मूल काळे होईल, अशी येथील लोकांमध्ये मान्यता आहे. जारवा जमातीमध्ये फक्त काळ्या रंगाच्या मुलांनाच समाजात राहण्याची मान्यता मिळते.