आज आठवड्याचा पहिलाच दिवस सोमवार. आज मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह इतर शहारातल्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे.

आज प्रतितोळा सोन्याच्या दरात 370 रुपयांची घट होऊन सोन्याचा दर 55 हजार 400 रुपयांवर व्यवहार करतोय.

आजच्या बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा दर 50 हजार 783 रुपयांवर आहे. त्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदीसाठी ही चांगली संधी ठरु शकते.

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही आज घट झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 63 हजार 740 रुपयांवर आला आहे. चांदीच्या दरात तब्बल 870 रुपयांची घट झाली आहे.

लग्नसराईत सोन्याचे दर कमी होत आहेत त्यामुळे ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला आहे. मात्र, अजूनही सोन्याचे दर म्हणावे तितके कमी आलेले नाहीत.

जागतिक बाजारात देखील सोन्या-चांदीबरोबरच मौल्यवान धातूंच्या जसे की, जस्त, शिसे, तांबे यांच्या किंमतीत काहीशी घट झालेली आहे.

जागतिक बाजारात सोन्याचे आजचे दर 0.42 टक्क्यांच्या घसरणीसह 1,842.50 डॉलर प्रति औंसवर आले आहेत.

तुम्हाला जर दागिन्यांची शुद्धता तपासायची असेल तर तुम्ही BIS CARE APP द्वारे तपासू शकता.