आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात झाली आहे.



आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात झाली आहे.



सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह व्यवहार करत असल्याचं पाहायला मिळत आहे.



जागतिक बाजारात चढ-उतार कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील संमिश्र परिस्थितीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे.



आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. सेन्सेक्स 59400 च्या खाली घसरला शिवाय निफ्टीही घसरण व्यवहार करत आहे.



शेअर बाजारात आज सुरुवातीच्या सत्रात व्यवहार मंदावलेले दिसत आहेत. यामुळे जवळपास सर्व प्रमुख निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहेत.



आजच्या सुरुवातीच्या सत्रात बीएसईचा (BSE) 30 शेअर्सचा निर्देशांक 132.62 अंकांनी म्हणजेच 0.22 टक्क्यांनी घसरून 59,331.31 वर उघडला.



याशिवाय, एनएसई (NSE) 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 37.20 अंकांच्या म्हणजेच 0.21 टक्क्यांच्या घसरणीसह 17,428.60 वर उघडला आहे.



आज शेअर बाजारात आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), नेस्ले (Nestle), ॲक्सिस बँक (Axis Bank), भारतीय स्टेट बँक (SBI) या शेअर्सची घोडदौड सुरु आहे.



याशिवाय कोटक महिंद्रा बँक, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, आयटीसी, बजाज फिनसर्व्ह, पॉवरग्रीड हे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत.



अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज, टायटन, सन फार्मा, एम अँड एम, इंडसइंड बँक, एचयूएल, बजाज फायनान्स, एल अँड टी हे शेअर्सही घसरले आहेत.