सनी लिओनी तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या फोटो-व्हिडिओ आणि सोशल मीडिया पोस्टमुळे जास्त चर्चेत असते. सनी लिओनीचा ग्लॅमरस लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सनी लिओनीचे 'डिंगर कॅट' हे गाणे रिलीज झाले आहे. कन्नड चित्रपट 'चॅम्पियन'च्या या गाण्यातील सनीचा डान्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ओटीटीवर सनीचा 'अनामिका' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनीनं तिच्या स्टाईलनं जगभरामध्ये विशेष ओळख निर्माण केली. सनी तिच्या नृत्यशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते. चित्रपटांबरोबरच सनी छोट्या पडद्यावरील रोडीज या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. सनी लिओनच्या कार कलेक्शनमध्ये मॅसेराटी, क्वाट्रोपोर्ट, बीएमडब्ल्यू 7 सीरीज आणि ऑडी ए5 या गाड्यांचा समावेश आहे. सनीच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमी नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात.