बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूजा भलेही फिल्मी दुनियेपासून दूर असली तरी तिचे कॉमेडी व्हिडीओ अनेकदा व्हायरल होतात. जेनेलियाची फॅशन स्टाइलही जबरदस्त आहे. अलिकडेच जेनिलियाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जेनेलिया डिसूझाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती इंडो-वेस्टर्न पोशाखात दिसत आहे. ब्लॅक कलरच्या ऑफ शोल्डर अँकल लेन्थ गाऊनमध्ये जेनेलिया खूपच ग्लॅमरस दिसत आहे. हा गाऊन सिल्व्हर एम्ब्रॉयडरीमध्ये केला आहे, जो तिच्या वेस्टर्न आउटफिटला भारतीय टच देत आहे. या आउटफिटसोबत जेनेलियाने पिरोजा आणि सिल्व्हर रंगाचे कानातले घातले होते. तिने काळ्या हील्स, बन हेअरस्टाइल आणि किमान मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला. दिग्दर्शक निर्माता करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी जेनेलियाने हा लूक कॅरी केला होता.