जान्हवीने तिच्या इन्स्टावर काही फोटो शेअर करत मे महिन्यात काय-काय केलं ते सांगायचा प्रयत्न केलाय. तिने काही रँडम फोटो शेअर केले आहेत. यात ती वर्कआऊट करत असतानाचे फोटो आहेत. मेकअप करतानाचाही एक फोटो आहे. घरातील रँडम फोटोजही तिने शेअर केले आहेत. या सर्व फोटोंमध्ये जान्हवी अगदी क्यूट दिसत आहे. ती फिटनेसवर किती लक्ष देते हे या पोस्टमधूनही कळत आहे. एक रँडम फिल्टरमधील व्हिडीओही यात आहे. काही दिवसांपूर्वी तिने पोस्ट केलेले धांसू ड्रेसमधील फोटोजही या पोस्टमध्ये आहेत. या सर्व फोटोंवर चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत.