अजगराने एकाच वेळी तीन ससे गिळून वेटोळे घालून बसल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.



नागपूरच्या रामटेक तालुक्याच्या खुमारी शिवारातील एका रिसॉर्टवरील फार्म हाऊसवर हा अजगर आढळला



या फार्म हाऊसवरील ससाच्या पिंजऱ्यात जाऊन या अजगराने तीन सशांना गिळंकृत केलं.



एवढंच नाही तर तीन ते चार पिलं बाजूलाच मृत स्थितीत होती.



त्यानंतर सुस्तावलेला हा अजगर एकाच ठिकाणी बसून होता.



इथल्या कर्मचाऱ्यांनी वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे प्राणी मित्र राहुल कोठेकर आणि अजय मेहरकुळे यांना माहिती दिली.



सर्पमित्रांनी या अजगराला शिताफीने पकडले.



गिळलेले ससे बाहेर काढल्यानंतर अजगराला जंगलात सोडून देण्यात आले.



हा अजगर सुमारे 10 फुटांचा असून फार्म हाऊसवर या अजगराला पाहून कर्मचारी चांगलेच धास्तावले होते.



Thanks for Reading. UP NEXT

विष्णू मनोहरांच्या महाप्रसाद उपक्रमात फडणवीसांची 'फोडणी

View next story