अभिनेत्री जिनिलिया देशमुख ही सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो शेअर करत असते. जिनिलिया देशमुखनं नुकतेच तिचे खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. जिनिलियानं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती गोल्ड आऊटफिट, मोरळे केस , गोल्डन ज्वेलरी अशा लूकमध्ये दिसत आहे. जिनिलियाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. “Never underestimate the investment you make in yourself” असं कॅप्शन जिनिलियानं या फोटोला दिलं आहे. जिनिलियानं शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. जिनिलिया ही वेड या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. जिनिलियाच्या वेड या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. जिनिलियाचे चाहते तिच्या आगामी चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत. जिनिलियाचा चाहता वर्ग मोठा आहे.