नृत्यांगणा गौतमी पाटीलने महाराष्ट्रभर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
महाराष्ट्रभर गौतमीचा मोठा चाहतावर्ग असून तिच्या लावणी कार्यक्रमाला चाहते मोठी गर्दी करत असतात.
गौतमी पाटील लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या.
आता एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत गौतमीने लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.
गौतमी म्हणाली की,अजून तरी मी लग्नाचा विचार केलेला नाही. पण जेव्हा लग्न ठरेल, तेव्हा मी तुम्हाला सर्वांना आवर्जुन सांगेन. सर्वांना पत्रिकाही देईन.
गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत लग्नाबद्दल बोलताना गौतमी म्हणाली होती,तुम्ही लग्नाला या आणि तिथेही गोंधळ घालून जा.
गौतमी गेल्या काही दिवसांपासून लग्नाबद्दल भाष्य करत असल्याने ती लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तरुणांमध्ये गौतमीच्या डान्सची चांगलीच क्रेझ आहे.
गौतमी पाटील आपल्या डान्समध्ये अश्लील हावभाव करत असल्याने तिच्यावर प्रचंड टीका होते.
गौतमीने आपल्या अदाकारीने सर्वांना वेड लावलं आहे.