अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी जगातील टॉप 10 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत.

त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनाही मागे टाकले आहे.

अदानी समूहाच्या कंपन्यांमधील नेत्रदीपक तेजीमुळे गौतम अदानी 118 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सहाव्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तींमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, मुकेश अंबानी $97.4 अब्ज संपत्तीसह 11व्या स्थानावर आहेत.

प्रत्यक्षात अदानी समूहाच्या सात कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत.

या कंपन्यांमध्ये अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवर, अदानी विल्मर, अदानी टोटल गॅस, अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी ट्रान्समिशन यांचा समावेश आहे.

गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

त्यामुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे.

ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, टेस्लाचे इलॉन मस्क हे 249 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत.

तर, या यादीत अॅमेझॉनचे जेफ बेकोस दुसऱ्या स्थानावर आहेत. आतापर्यंत जगातील टॉप 10 अब्जाधीशांपैकी 8 व्यक्ती अमेरिकेतील, एक फ्रान्स आणि एक भारताचा आहे आणि यामध्ये गौतम अदानी यांचे नाव आहे.