भारताचा स्टार क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) घरात दुसऱ्यांदा पाळणा हलणार आहे.
अजिंक्यची पत्नी राधिका धोपावकरनं (Radhika Dhopavkar) तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून बेबी बंपचा फोटो शेअर करून ही गुड न्यूज दिलीय.
अजिंक्य रहाणे आणि राधिका लहानपणापासून मित्र होते. त्यांनी 26 नोव्हेंबर 2014 रोजी मुंबईत लग्न केलं होतं.
5 ऑक्टोबर 2019 मध्ये अजिंक्य रहाणेनं आपण पहिल्यांदा बाप होणार असल्याची महिती दिली होती.
त्यानंतर पुन्हा अजिंक्य रहाणेच्या घरात पाळणा हलणार आहे.
त्याची पत्नी राधिकानं नुकताच इन्टाग्रामवर बेबी बंपचा फोटो पोस्ट करून दुसऱ्यांदा आनंदाची बातमी दिली. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं 'आक्टोबर 2022' असं लिहलंय.
म्हणजेच, ऑक्टोबर 2022 मध्ये राधिका दुसऱ्यांदा आई होणार असल्याचं तिच्या पोस्टवरून स्पष्ट होतंय.
राधिकाच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिचं अभिनंदनही केलंय.
रहाणेनं भारतासाठी आतापर्यंत 82 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं 38.5 च्या सरासरीनं 4 हजार 931 धावा केल्या आहेत. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 2 हजार 962 धावांची नोंद आहे. टी-20 क्रिकेटमध्ये त्याला 375 धावा करता आल्या आहेत.