काही दिवसांपूर्वी आलेल्या एका बॉलिवूड पटात देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धाडीचं चित्रण करण्यात आलं होतं.

असचं काहीसा प्रकार काल कर्नाटकात घडला. कर्नाटकात काल लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं एकूण साठ ठिकाणी धाडी घातल्या.

पण त्यानंतर जे समोर आलं ते खरंच हादरवणारं होतं.

कारवाईदरम्यान, चक्क पाण्याच्या पाईपलाईनमध्ये नोटांची बंडल सापडले. ही घटना बेळगावातील गुलबर्ग्यात घडली.

कर्नाटकात बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं एकूण साठ ठिकाणी धाडी घातल्या.

ही लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं केलेल्या सर्वात मोठ्या कारवायापैकी एक आहे.

या कारवाईदरम्यान एसीबीनं एकूण साठ ठिकाणी धाडी घातल्या.

यादरम्यान गुलबर्गा येथील एका सरकारी अधिकाऱ्याच्या निवासस्थानी तर कुबेराचा खजिनाच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या हाती लागला.

सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, सोन्याची नाणी, सोन्याच्या लगडी, चांदी या बरोबरच मोठी रोख रक्कम या अधिकाऱ्याच्या घरी मिळाली.