स्वयंपाकघर ही आपल्या घरातील अतिशय महत्त्वाची जागा असते. प्रत्येक गृहिणीचे स्वप्न असते की, आपलं स्वयंपाकघर नीटनेटके असावे. घर घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कधीही स्वयंपाकघराचा विचार केला जातो. स्वयंपाक घरात या वस्तूंचा समावेश असायला हवा. स्वयंपाकघरात कूकर, तवा, मिक्सर, चाकू या गोष्टी गरजेच्या असतातच. स्वंयकपाक घरातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेगडी. काळानुसार स्वयंपाकघरातील भांडी देखील बदलली आहेत असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. पूर्वी लोखंड, पितळ आणि तांब्याची भांडी वापरली जात होती. आता बहुतांश महिला नॉन स्टीक भांडी घेणे अधिक पसंत करतात. पण अजूनही अनेक घरांमध्ये पितळ आणि तांब्याची भांडी बघायला मिळतात.