यूट्यूबर अरमान मलिकचे संपूर्ण कुटुंब सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
यूट्यूबर अरमान मलिक आणि त्याची त्याची दोनीही पत्नी यावेळी बिग बॉस ओटीटी 3 मध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.
पहिली बायको पायल आणि दुसरी बायको कृतीका या दोघांनी ही या शो मध्ये भाग घेतला आहे.
बिग बॉस 3 ओटीटी या शो मध्ये तिघेही उत्तम खेळ खेळत आहेत.
त्या तिघांमध्ये कोणतेही मतभेद नाही.
परंतु अरमान मलिकच्या पहिल्या बायकोचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
ज्यामध्ये पहिली बायको पायल घटस्फोटाची मागणी करत आहे.
अरमान घटस्फोटाचा पूर्णपणे विरोध करत आहे.
व्हायरल व्हिडिओवर नेटकरी पायल आणि अरमानला ट्रोल करत आहेत.
नेटकरी म्हणत आहेत की,एक व्हिडिओ बनवण्यासाठी हे लोकं आपल्या कुटुंबाची ही पर्वा करत नाहीत.