अभिनेता सनी देओल यांचा 'घातक' चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट 1996 मध्ये प्रदर्शित झाला होता.

'घातक' चित्रपटात सनी देओल यांच्यासोबत मीनाक्षी शेषाद्री मुख्य भूमिकेत होत्या.

या चित्रपटात अमरीश पुरी यांनी सनी देओल यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

राजकुमार संतोषी यांनी 'घातक' चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

'घातक' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

'घातक' चित्रपटातील गाणी खूप लोकप्रिय झाली होती.

सनी देओल यांच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट पुन्हा पाहण्याची संधी आहे.

सनी देओलचा 'घातक' हा चित्रपट 21 मार्च 2025 रोजी चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित होणार आहे.

सनी देओलने या चित्रपटाच्या री-रिलीजची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.