यूट्यूबर रणवीर अलाहबादियाचे दोन यूट्यूब चॅनल हॅक करण्यात आले आहेत. त्याचे यूट्यूबवर BeerBiceps नावाचे चॅनल होते. त्याला @Tesla.event.trump_2024 असे नाव देण्यात आले आहे. रणवीर अलाहबादियाने वयाच्या २२ व्या वर्षी यूट्यूब चॅनल सुरू केले. रणवीर कडे 7 यूट्यूब चॅनल आहेत आणि 12 M पेक्षा जस्त फॉलोवर्स आहेत. रणवीर अलाहबादिया त्याच्या चॅनेलवर फिटनेस, प्रेरणा आणि पॉडकास्ट व्हिडिओ शेअर करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणवीर अलाहाबादियाची एकूण संपत्ती 60 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तो भारतातील सर्वात श्रीमंत YouTubers पैकी एक आहे. त्यांचे शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून झाले. रणवीरने टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकी पदवी घेतली आहे. 2018 मध्ये, रणवीर अल्लामदियाने 'द रणवीर शो' सुरू केला, ज्यामध्ये आतापर्यंत अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी भाग घेतला आहे.