अभिनेत्री प्रिया बापट ही तिच्या अभिनयाने कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.



प्रियाने नुकतच तिच्या सोशल मीडियावरुन तिचे काही फोटो शेअर केले आहेत.



तिच्या मादक अदांनी प्रियाने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत.



प्रियाला नुकतच झी गौरवच्या मराठी पाऊल पडते पुढे या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.



'रात जवान हैं' या कार्यक्रमातून प्रिया ओटीटीवर पुन्हा एकदा ओटीटीवर धमाका करण्यास सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय.



नुकतच प्रियाने एका मुलाखतीमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही भाष्य केलं होतं.



यावर बोलताना प्रियानं म्हटलं की, , तुमचं लग्न झालं असेल आणि तुम्हाला बाळ असेल तरंच तुमचं आयुष्य पूर्ण होतं, असं लोकांना का वाटतं?



प्रियाने आपल्या मुलाखतीत पुढे म्हटले की, आमच्या कपल फोटोवर बाळाबद्दल विचारणाऱ्या कमेंट्स असतात. उमेशच्या फोटोवर या कमेंट्स नसतात, अर्थात मी महिला असल्याने ही अपेक्षा माझ्याकडून आहे. पण मला जेव्हा वाटेल की बाळ हवंय, तेव्हा मी करेन, जर मला बाळ नको असेल तर मी नाही करणार असेही प्रियाने स्पष्ट म्हटले.