तुम्ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असाल आणि फॅशनबद्दल तुम्हाला आवड असेल तर काही वेळेस तुम्ही नॅन्सीचे व्हिडीओ पाहिले असतील. नॅन्सीचे फॅशन ड्रेसच्या व्हिडीओवर लाइक्सचा वर्षाव होत असतो. आता याच नॅन्सीने थेट कान्सच्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला आहे. बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर नॅन्सीने यूपीएससीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 2020 मध्ये दिल्ली गाठली. कोरोना महासाथीच्या काळात कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळू लागल्यानंतर तिने शिवणकाम सुरू केले. नॅन्सीने आपल्या या शिवणकामाला सोशल मीडियाची जोड दिली. नॅन्सीने तिने शिवलेल्या कपड्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली. नॅन्सीने तयार केलेल्या फॅशन व्हिडीओला लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. हळूहळू ती आउटफिट डिझाइनमुळे चर्चेत राहू लागली