भर उन्हात जान्हवीची चमचमती शिमर साडी! अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या लूक आणि ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. जान्हवी सध्या आपल्या आगामी 'मिस्टर अॅन्ड मिसेज माही' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. जान्हवी तिच्या अभिनयानं आणि ग्लॅमरस अंदाजानं अनेकांची मनं जिंकते. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या धडक या चित्रपटामधून जान्हवीनं अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटातील जान्हवीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. जान्हवीच्या लूक्स, स्टाईल आणि अभिनयामुळे तिचा चाहता वर्ग मोठा आहे. जान्हवी अभिनयासोबतच मॉडेलिंग क्षेत्रात देखील काम करते. जान्हवी तिच्या चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. जान्हवी माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या नातवाला म्हणजेच शिखर पहाडियाला डेट करत आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती.