नागार्जूनच्या लहान मुलाचं लग्न कधी होणार? 6 दिवसांनंतर नागाचैतन्यचा लग्नाचा मुहूर्त
साऊथ सुपरस्टार नागार्जूनच्या घरी सध्या डबल गूड न्यूज आहे. त्याची दोन्ही मुलं लवकरच लग्न करणार आहेत.
नागार्जूनच्या मोठा मुलगा नागाचैतन्य डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधणार आहे.
त्यातच आता छोटा मुलगा अखिल अक्किनेनी याच्या अलिकडे साखरपुडा पार पडला.
त्यामुळे आता दोन्ही मुलं एकाच मांडवात लग्न करणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र, नागा चैतन्यचं लग्न 4 डिसेंबरला होणार आहे, पण अखिलच्या लग्नाला अजून वेळ आहे.
नागार्जूनने अलिकडे झूमला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, आता त्यांच्या घरात दोन सूना येणार आहे, त्यांच्या स्वागतासाठी तो खूप आनंदी आहे.
शोभिता आणि नागा चैतन्य यांचं लग्न 4 डिसेंबरला अन्नपूर्ण स्टुडिओमध्ये होणार आहे. हा स्टुडिओ माझ्या वडिलांना बांधला होता.
आम्ही आधी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न करण्याच्या विचारात होतो, पण आमचं कुटुंब मोठं आहे आणि शोभिताचं कुटुंबही मोठं आहे.
अखिलबद्दल नागार्जून यांनी म्हटलं की, मी त्याच्यासाठी आनंदी आहे. जैनब खूप चांगली मुलगी आहे.
त्या दोघांनी आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय घेतल्याने आम्ही सर्व खूप आनंदी आहोत, त्यांचं लग्न 2025 मध्ये होईल.
नागा चैतन्य गर्लफ्रेंड शोभिता धुलिपालासोबत दुसरं लग्न करणार आहे. याआधी त्याचं अभिनेत्री समंथासोबत लग्न झालं होतं, 2021 मध्ये त्यांच्या घटस्फोट झाला.
अखिल अक्किनेनी याची ही दुसरी संधी आहे. अखिल जैनव रावदजीसोबत लवकरच लग्न करणार आहे. याआधी त्याचा श्रिया भुपालसोबत साखरपुडा झाला होता, मात्र तो मोडला.