छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) हिचं निधन झालं आहे.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

मुंबईतील मीरारोड परिसरातील निवासस्थानी तिचे निधन झाले. ती अवघ्या 38 वर्षांची होती

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

प्रिया मराठे हिला काही वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले. मध्यंतरी ती या दुर्धर आजारातून बरीही झाली होती.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

मात्र, अलीकडेच तिच्या शरीरात कर्करोग पुन्हा पसरु लागला. अखेर शनिवारी सकाळी तिची प्राणज्योत मालवली. (Priya Marathe Passes Away)

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

प्रिया मराठे ही मध्यंतरी कर्करोगातून बरीही झाली होती. तिने यानंतर परदेशात एका नाटकाचा दौरा केला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये कर्करोगाने पुन्हा डोकेवर काढले होते

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र, तिचे शरीर या उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. आज शनिवारी सकाळी तिचे दुर्दैवी निधन झाले आहे.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

प्रिया मराठे हिचा जन्म 23 एप्रिल 1987 रोजी ठाणे, महाराष्ट्र येथे झाला. ती 38 वर्षांची होती. मराठी सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या घरात त्यांचे बालपण घडले.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

अकरावीमध्ये शिकत असताना प्रियाला महाविद्यालयीन नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आणि तिथूनच त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाची सुरुवात झाली. अभिनयातील वाढते आकर्षण त्यांनी करिअर म्हणून स्वीकारले.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

2005 साली 'या सुखांनो या' या मराठी मालिकेमधून प्रिया मराठे हिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर 'चार दिवस सासूचे', 'तू तिथे मी', आणि 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकांमधील त्यांच्या सशक्त भूमिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः तिच्या निगेटिव्ह भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा