मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असते.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

छोट्या पडद्यावरील जुळून येते रेशीमगाठी या मालिकेतून प्राजक्ताला घराघरातून प्रसिद्धी मिळाली.

सोशल मीडियावर देखील प्राजक्ताची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्राजक्ताने लाखो लोकांच्या मनात घर केलं आहे.

प्राजक्ताच्या (Prajakta Mali) चाहत्यांना नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं.

अशातच प्राजक्ताने नुकतेच राखाडी रंगाच्या साडीमधील मनमोहक फोटो शेअर केले आहेत.

राखाडी साडीवर प्राजक्ताने लाल रंगाच्या ब्लाऊज परिधान केला आहे. यात ती अतिशय सुंदर दिसत आहे.

राखाडी साडी, लाल ब्लाऊज आणि गळ्यात हार अशा खास लूकमध्ये प्राजक्ताचं सौंदर्य खुलून आलं आहे.