हाजी हसनल बोल्किया हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मानले जातात.

त्यांची संपत्ती तेल आणि नैसर्गिक वायूच्या विपुल साठ्यांमुळे आहे.

त्यांना गाड्यांचा खूप मोठा आणि महागडा संग्रह आहे,

ज्यात हजारो लक्झरी गाड्यांचा समावेश आहे.

हाजी हसनल बोल्किया यांच्याकडे रोल्स रॉयल्स, बुगाटी, लॅम्बोर्गिनी मर्सिडीज बेंझ, पोर्शे, यासारख्या अनेक लक्झरी गाड्यांचे कलेक्शन त्यांच्याकडे आहेत.

त्यांचे निवासस्थान इस्ताना नुरुल इमान हे जगातील सर्वात मोठे राजवाडा मानले जाते.

हाजी हसनल बोल्किया आशियातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक मानले जातात.

वयाच्या १५ व्या वर्षी त्यांना क्राउन प्रिन्स म्हणून घोषित करण्यात आले.

त्यांनी 'सुल्तान हाजी हसनल बोल्किया फाउंडेशन' च्या माध्यमातून अनेक सामाजिक आणि परोपकारी कार्ये केली आहेत.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.