हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते.
या दिवशी सर्व विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात.
वटपौर्णिमा हा महिलांसाठी अतिशय महत्त्वचा सण मानला जातो.
या दिवशी विवाहित महिला वडाच्या झाडाची विधीपूर्वक पूजा करतात.
आणि मनोभावे पूजा करून सात जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात.
नुकतंच कारेगावच्या सरपंच निर्मला शुभम नवले यांचा वटपौर्णिमेचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये चांगलाच चर्चेत आहे.
प्रत्येक जन्मी हाच पती मिळवा, म्हणून निर्मलाताईंनी वडाची पूजा केली आहे.
त्यांनी अतिशय सुंदर शब्दात या पोस्ट केलेल्या व्हिडिओ खाली वटपौर्णिमेचे महत्त्व पटवून दिले आहे.
निर्मलाताईंनी वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी कारेगावच्या सरपंच झाल्या.
जेवढ्या त्या सोशल मीडियामध्ये सक्रिय आहेत त्यापेक्षा जास्त सहभाग त्यांचा सामाजिक कार्यात दिसून येतो.