अभिनेत्री सई ताम्हणकर आपली उत्तम शैली आणि अभिनयामुळे ओळखली जाते.
सई ताम्हणकरचा आज वाढदिवस आहे.
आज 25 जून रोजी सई आपला 38 वा वाढदिवस साजरा करणार आहे.
छोट्या पडद्यावरुन सुरुवात करणारी सई तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठ्या पडद्यारपर्यंत पोहोचली आहे.
सईच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दलच्या खास गोष्टी जाणून घ्या.
छोट्या पडद्यावरील या गोजिरवाण्या घरात या मालिकेपासून सईने अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली.
बोल्ड, ग्लॅमरस, बिनधास्त अशी सई ताम्हणकरची ओळख कलाविश्वात ओळख बनली.
सईने तिच्या अभिनयाच्या जोरावर या मराठी कलाविश्वात आपला ठसा उमठावला.
सई ताम्हणकर फॅशन आयकॉन आहे. तिचा स्टायलिश लूक नेहमीच चर्चेत असतो.
परफेक्ट साडी असो किंवा मग वेस्टर्न ड्रेस, सई प्रत्येक आऊटफिटमध्ये तितकी ग्लॅमरस दिसते.