काही दिवसापूर्वी मोहम्मद सिराजचं नाव चर्चेत आलं होतं.
मोहम्मद सिराजचं माहिरा शर्मा सोबत नाव जोडलं गेलं होतं.
याचं कारण म्हणजे मोहम्मद सिराजने माहिरा शर्माचा इंस्टाग्रामचा फोटो शेअर केला होता.
त्यानंतर मोहम्मद सिराज आणि माहिराच्या अफेअरची चर्चा होऊ लागली होती.
त्यानंतर आता भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव सुद्धा चर्चेत आला आहे.
काही दिवसापूर्वी रविना टंडनची मुलगी राशाने एक फोटो पोस्ट शेअर केला.
त्या फोटोमध्ये तम्मणा भाटिया, डायना पेंटी, राशा हे तिघे मस्ती करताना दिसले.
कुलदीप यादवने या फोटोला लाईक केलं आणि त्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
सोशल मीडियावर कुलदीप यादव आणि राशाचं नाव एकत्र जोडलं जात असून त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.