चॉकलेट खाणे सर्वांनाच आवडतं.
चॉकलेटमुळे शरीरातले स्ट्रेस हार्मोन्स कमी होण्यास मदत होते
पण जर तुमचे आवडते चॉकलेट बुरशीने भरलेले निघाले तर....?
हैदराबादमध्ये असाच काहीसा प्रकार उघडकीस आला आहे
चॉकलेटचं रॅपर उघडल्यानंतर बुरशी आढळली आहे
संबंधित व्यक्तीने हा सर्व प्रकार सोशल मीडियावर शेअर केला.
सोबतच त्याने बुरशी आलेल्या चॉकलेटचे फोटो शेअर केले आहेत.
ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे चॉकलेट जानेवरी 2024 ला बनवण्यात आले होते.
आणि या चॉकलेटची एक्स्पायरी डेट 12 महिन्यानंतरची होती.
तरी सुद्धा हे चॉकलेट कसे खराब झाले असा प्रश्न आता सोशल मीडियावर विचारला जातोय.