अभिनेत्री नुकतीच संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' या सिरिजमध्ये दिसली होती.
तिने एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केलं आहे.
यावेळी अभिनेत्रीने नेहमीच चुकीच्या पुरुषांच्या प्रेमात पडली असल्याचं म्हटलं.
वयाच्या 53 व्या वर्षीदेखील ही अभिनेत्री खऱ्या आणि प्रामाणिक जोडीदाराच्या शोधात आहे.
मनीषा कोईराला 5-6 वर्षांपासून सिंगल आहे.
मनीषा एका चांगल्या नात्यात येण्याचा विचार करतेय.
एकमेकांशी प्रामाणिक राहणाऱ्या जोडीदाराच्या शोधात असल्याचं तिने सांगितलंय.
तिला असा जोडीदार हवा आहे ज्याची काही स्वप्नं आहेत.
मनीषा आणि सम्राटचे 2010 मध्ये लग्न झाले.
त्यानंतर 2012 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.