एल्विश यादव जामीनावर सुटताच सिद्धिविनायकाच्या चरणी!
एल्विश यादव हे नाव हल्ली चर्चेत आहे.
'बिग बॉस ओटीटी 2'चा विजेता एल्विश यादववर गुन्हा दाखल झाला होता.
नोएडातील रेव्ह पार्टीवरील छाप्यादरम्यान त्याच्यासह आणखी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रेव पार्टी, सापाचं विष, परदेशी मुलींचा 'सप्लाय' केल्याच्या प्रकरणात तो सध्या अडकलेला असल्याचं पाहायला मिळतं
सापाच्या विषाचा पुरवठा केल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी त्याला अटक केली होती.
रविवारी १७ मार्च रोजी एल्विशला नोएडा पोलिसांनी अटक केली होती.
याप्रकरणी एल्विश यादवला २२ मार्च रोजी जामीन मंजूर झाला होता
एल्विशनं रेव्ह पार्ट्यांमध्ये साप आणि सापाच्या विषाचा पुरवठा केल्याची कबुली दिल्याचं म्हटलं जात होतं,
आता एल्विशला जामीन मिळाला आहे.
दोन प्रकरणांमध्ये जामीन मिळाल्यानंतर लगेच जामीनाचा पुरेपूर फायदा घेत असल्याचं पाहायला मिळालं
त्याने मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायकाच्या चरणी जाऊन आशीर्वाद घेतल्याचं पाहायला मिळालं