2024 हे वर्ष बॉलिवूडपासून ते साऊथ चित्रपटसृष्टीसाठी खूपच महत्त्वाचं ठरलं आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: facebook

यंदा अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले, तर काहींना प्रचंड यश मिळालं.

Image Source: facebook

पण काही चित्रपट असे होते ज्यांनी अक्षरशः कमाईचा पाऊस पाडला. या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाले

Image Source: facebook

बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या यशामुळे अनेक कलाकारांचं करिअर नव्या उंचीवर पोहोचलं.

Image Source: facebook

चला तर, पाहूया 2024 मध्ये धमाल करणारे हे पाच प्रमुख फिल्मी स्टार्स कोण आहेत

Image Source: facebook

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूरचा ‘स्त्री 2’ हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. 60 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने जगभरात 850 कोटींहून अधिक कमाई करत सुपरहिट ठरला.

Image Source: facebook

कार्तिक आर्यन

2022 मधल्या ‘भूल भुलैया 2’ ने कार्तिकला सुपरस्टार बनवलं होतं. यंदा आलेला ‘भूल भुलैया 3’ देखील प्रेक्षकांना खूप आवडला. या चित्रपटाने तब्बल 389 कोटींची कमाई केली आणि कार्तिकचा स्टारडमला आणखी वलय प्राप्त करुन दिले.

Image Source: facebook

अर्जुन कपूर

सिंघम अगेनमध्ये त्याने साकारलेल्या व्हिलनच्या भूमिकेने सर्वांचं लक्ष वेधलं. ज्यामुळे त्याचं करिअर नव्या वळणावर पोहोचलं.

Image Source: facebook

अभय वर्मा

मुंज्या नावाचा चित्रपट 30 कोटींच्या बजेटमध्ये बनला आणि 125 कोटींची जबरदस्त कमाई केली. आता अभय ‘किंग’ या 2026 मध्ये येणाऱ्या शाहरुख खान आणि सुहाना खान यांच्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Image Source: facebook

अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 ने संपूर्ण देशभर धुमाकूळ घातला. या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांत 1409 कोटींची कमाई करून इतिहास रचला.

Image Source: facebook