रिॲलिटी शो खतरों के खिलाडी सुरू होणार आहे.
स्पर्धकांची यादीही जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.
आसिम रियाझ याआधी रिॲलिटी शो बिग बॉस 13 मध्ये दिसला होता, जिथून त्याला खूप प्रसिद्धी मिळाली.
मात्र यानंतर त्यांला कोणताही फार मोठा प्रोजेक्ट मिळाला नाही.
पण आता आसिम खतरों के खिलाडीमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने स्वतः याची कबुली दिली आहे.
आणि सांगितले की तो त्याच्या चाहत्यांकरिता कमबॅक करत आहे.
असीम म्हणाला मी स्टंटचा सामना करण्यासाठी आणि माझ्या मर्यादांची परीक्षा घेण्यासाठी खूप उत्साहित आहे.
मी काय करू शकतो हे माझ्या चाहत्यांना दाखवण्यासाठी खूप उत्सुक आहे.
बिग बॉसमध्ये असताना माझ्या चाहत्यांनी मला नेहमीच प्रेम दिले आहे.
आसिम हा फिटनेस लवर आहे. तो नियमितपणे जिममध्ये जातो आणि दररोज व्यायाम करतो.