सैराट चित्रपटातून नावारुपाला आलेल्या परश्याचा म्हणजेच आकाश ठोसरचा आज वाढदिवस आहे. (Photo credit : Instagram/@akashthosar) आकाशचा जन्म पुण्यात झाला असून त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमधून झाले आहे. (Photo credit : Instagram/@akashthosar) पहिल्याच चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आकाश हा प्रकाशझोतात आला. (Photo credit : Instagram/@akashthosar) या चित्रपटातून आर्ची आणि परश्याची जोडी महाराष्ट्राच्या भेटीला आली. (Photo credit : Instagram/@akashthosar) एका मराठी चित्रपटातून भेटीला आलेला हा तरुण आता अगदी बॉलीवूडकरांच्या देखील पंगतीत जाऊन बसला आहे. (Photo credit : Instagram/@akashthosar) आकाश रवी जाधव यांच्या आगामी बाल शिवाजी या चित्रपटात शिवरायांची भूमिका साकारणार आहे. (Photo credit : Instagram/@akashthosar) 'सैराट' फेम आकाश ठोसरला शिवरायांच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. (Photo credit : Instagram/@akashthosar) आकाशने झुंड या चित्रपटातून बॉलीवूडमध्येही पदार्पण केलं. (Photo credit : Instagram/@akashthosar) ओटीटीवर तो लस्ट स्टोरीजमध्ये अभिनेत्री राधिका आपटेसोबतही पहायला मिळाला. (Photo credit : Instagram/@akashthosar) सैराट या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर आकाश अनेक दर्जेदार चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Photo credit : Instagram/@akashthosar)