अभिनेत्री अदा शर्मा तिच्या एका खास रॅम्प वॉकमुळे चर्चेत आहे

ज्यामध्ये तिने हातात तलवार घेतली होती. या अनोख्या अंदाजाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

अदा शर्मा मुंबईतील एका फॅशन वीक मध्ये डिझायनर नियारा इंडिया साठी शोस्टॉपर म्हणून रॅम्पवर उतरली होती.

तिने काळ्या रंगाचा हेवी एम्ब्रॉयडरी असलेला सुंदर लेहंगा परिधान केला होता, ज्यासोबत डीप नेक ब्लाऊज होता.

तिने एका खांद्यावर पदर घेत साडीसारखी Drape केली होती, ज्यामुळे तिला रॉयल प्रिन्सेससारखा लूक मिळाला होता.

विशेष म्हणजे, अदाने केवळ सुंदर वेशभूषाच नव्हे, तर हातात एक तलवार घेऊन रॅम्प वॉक केला.

तिने दोन्ही हातात तलवार पकडून क्लासिकल योद्धा स्टाईलमध्ये मार्शल आर्टचे काही Moves दाखवले, ज्यामुळे उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले.

अदाचा हा अनोखा अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

तिच्या आत्मविश्वासपूर्ण चालण्याची आणि तलवार चालवण्याच्या स्टाईलची प्रशंसा होत आहे.

तिचा हा 'तलवारवाली राजकुमारी' चा लूक चाहत्यांच्या मनात कायम घर करून राहील.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.