तेजस्वी प्रकाशचा संपूर्ण महाराष्ट्र तसेच देसभरात मोठा चाहतावर्ग आहे.
Published by: अदिती पोटे, एबीपी माझा
तिने टीव्हीवर साकारलेल्या भूमिकांमुळे तिच्यावर लाखो लोक प्रेम करतात.
याआधी तेजस्वी प्रकाश बिग बॉस या रियालिटी शो तसेच नागीण यासारख्या मालिकांत दिसलेली आहे.
त्यानंतर आता ही अभिनेत्री सेलिब्रिटी मास्टरशेफ या कार्यक्रमात दिसत आहे.
नुकतेच तेजस्वीने तिचे नवे फोटो शेअर केलेत.
ज्यात अभिनेत्री क्लासिक गाऊन मध्ये दिसत आहे.
ब्लॅक बॉटम आणि रेड टॉप असा हा गाऊन तीच्यावर खुलून दिसतोय.
सलमान खानच्या 'बिग बॉस 15'मध्ये (Bigg Boss 16) तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. बिग बॉसच्या प्रवासादरम्यान तेजस्वी आणि करणची मैत्री झाली.
पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. बिग बॉसनंतर तेजस्वी एकता कपूरच्या'नागिन 6' या मालिकेत झळकली. तर करणने छोट्या पडद्यावरील काही कार्यक्रम होस्ट केले. करण आणि तेजस्वी दोघेही सध्या कामात वयस्त आहेत.