अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्या लाडक्या लेकीने आपल्या नवीन आयुष्याची सुरवात केली आहे.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हीने आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
सोनाक्षी सिन्हाने झहीर इक्बाल सोबत लग्नगाठ बांधली आहे.
नोंदणी पद्धतीने दोघांनी लग्न केलं आहे.
याची माहिती सोनाक्षी सिन्हाने आपल्या Instagram account वर सुंदर पोस्ट लिहून दिली.
सोनाक्षीने Instagram वर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
हे फोटो सोशल मीडियामध्ये आता प्रचंड व्हायरल होत आहेत.
या फोटोमध्ये सोनाक्षी आणि झहीर हे त्यांच्या कुटुंबियांसोबत दिसून येत आहे.
सोनाक्षीने ऑफ व्हाइट रंगाची साडी नेसली होती. सोबत उत्तम मेकअप आणि साजेसा हार तिने गळ्यात घातला होता.
झहीर यानेसुद्धा सोनाक्षीला मॅच होईल असे कापडे परिधान केले आहे.