बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सिनेमांसह (Movies) वेबसीरिजमध्येही (Web Series) आपल्या अभिनयाचा जलवा दाखवत आहे.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

व्यावसायिक आयुष्यासह वैयक्तिक आयुष्यामुळे ती अनेकदा चर्चेत असते.

शिल्पा शेट्टी ही १९९० च्या दशकातील लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री होती.

१९९३ साली तिने ‘बाजीगर’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.

‘मैं खिलाडी तू अनाड़ी’, ‘धडकन’, ‘लाइफ इन ए मेट्रो’ यांसारख्या सुपरहिट चित्रपट तिने केले आहेत.

सोशल मीडियावरील नव्या लूकसाठी शिल्पाने लाल रंगाचा कॉर्सेट टॉप आणि लाँग स्कर्ट परिधान केला आहे.

या आउटफिटवर शिल्पाने काळ्या रंगाचा चोकर गळ्यात परिधान केला आहे.

शिल्पाच्या गळ्यातील पेंडंटने खास लक्ष वेधलं आहे.

शिल्पा शेट्टी ४९ वर्षांची आहे पण तिच्या वयाचा अंदाज कोणीही लावू शकत नाही.