विश्वसुंदरी, बॉलिवूड अभिनेत्री, मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

मानुषीने 2022 साली बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या 'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

पहिल्याच सिनेमातील मानुषीचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मात्र फ्लॉप ठरला. मानुषी अभिनेत्री असण्यासोबत एक उत्तम मॉडेलदेखील आहे. तिने 2017 साली 'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकला होता.

त्यापूर्वी 2000 साली बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने या किताबावर नाव कोरलं होतं. मानुषी तिच्या ग्सॅमरस लूकने चाहत्यांना नेहमीच घायाळ करते.

सोशल मीडियावर ती चांगलीच अॅक्टिव्ह आहे. मानुषीचे अनेक प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये आहेत.

मानुषीने तिचा हा नवा लूक चाहत्यांसोबत शेअर केलाय ज्यात ती पिवळ्या साडीमध्ये आहे.

केसात फुलं घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.