अभिनेत्री जान्हवी किल्लेकर जेजुरीला खंडोबाच्या दर्शनाला पोचली. जान्हवीने भंडारा उधळत फोटो कढले. सोन्याची जेजुरी असा कॅप्शन देऊन तिने तिचे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. भाग्य दिले तु मला या मालिकेमधील तिचा अभिनय चाहत्यांच्या पसंतीस पडत होता. ह्या मालिकेच्या माध्यमातून ती सर्वांच्या घराघरात पोहोचली. तिने तिच्या अभिनयानी सर्वांची मनं जिंकली आहेत. निळ्या साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. जान्हवीने या फोटोंना तुझ्यासवे सांज रंगली असे मोहक कॅप्शन दिले आहे. जान्हवी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया वर शेअर करत असते. चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्स चा वर्षाव केला.