मालिकेत बाल कलाकार म्हणून झळकलेली छोटी स्टार आता मुख्य भूमिकेत झळताना दिसतेय. 2009 मध्ये, वयाच्या 5 व्या वर्षी, अशनूरनं झांसी की रानी या शोद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली. बाल कलाकार म्हणून कामाला सुरुवात केलेल्या अशनूरनं बऱ्याच मालिका, जाहिराती केल्या. तिच्या प्रत्येक कामाचं प्रेक्षकांनी कौतुक केलं होतं. तिला प्रेक्षकांचं प्रेमही तितकंच मिळालं आहे. अशनूर आता 20 वर्षांची झाली आहे. तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. अशनूर सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस फोटोंनी सर्वांना वेड लावते. अशनूरचे अनेक रिल्स व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असते.