टेलिव्हीजन अभिनेत्री हिना खान हिने तिचा अनेक वर्षांपासूनचा बॉयफ्रेंड असलेल्या रॉकी जयस्वालसोबत लग्नगाठ बांधली आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: instagram.realhinakhan

अभिनेत्रीच्या एका लहानशचा कार्यक्रमात गुपचूप लग्न उरकलं.

Image Source: instagram.realhinakhan

हिना खानच्या लग्नाचे फोटो तिनेही इंस्टाग्रामवरुन शेअर केले.

Image Source: instagram.realhinakhan

ब्रेस्ट कँसरच्या रोगाने त्रस्त असलेल्या हिना खानने तिचा प्रियकर मित्र रॉकीसोबत कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न केल.

Image Source: instagram.realhinakhan

पांढर्‍या क्रीम रंगाची ओपन ग्रीड साडी आणि हलक्या गुलाबी रंगाच्या ब्लाऊजवरच हिनाचं सौंदर्य अधिकच खुललं होतं

Image Source: instagram.realhinakhan

लग्नातील पारंपरिक पोशाखात दोघेही सर्वांचे लक्ष वेधत होते.

Image Source: instagram.realhinakhan

सोन्याचे दागिने, हातावरील सुंदर नक्षीकाम केलेली मेहंदी आणि मोकळे सोडलेले केस हिनाच्या सौंदर्याला अधिक उजळून टाकत होते.

Image Source: instagram.realhinakhan

आपल्या साडीच्या पदरावर हिनाने तिचे आणि तिच्या पती रॉकीचे नावही डिझाईन केले होते, रॉकीने व्हाईट कुर्ता परिधान केला होता.

Image Source: instagram.realhinakhan

हिनाने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये हिना खान पेपरवर सही करताना दिसून येते, म्हणजेच तिने कोर्ट मॅरेजच्या पेपरवर सही केल्याचं पाहायला मिळत आहे.

Image Source: instagram.realhinakhan

आपल्या जोडीदारासमवेत तिने प्रेमळ पोज देत फोटो काढले असून हातातील बांगड्या आणि पायातील पैंजणही लक्ष वेधून घेत आहे.

Image Source: instagram.realhinakhan

हिनाने फोटोसह भावनिक बंध निर्माण करणारे कॅप्शन दिले दोन वेगवेगळ्या जगातून आम्ही आपलं नवं विश्व उभारलंय एक नातं असं तयार झालंय ते आयु्ष्यभर जपलं जाईल.

Image Source: instagram.realhinakhan