बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या चर्चेत आहे. चंकी पांडे यांची लेक असलेल्या अनन्याने स्वत:चं घर खरेदी केलं आहे. धनत्रयोदशीच्या शुभमुहुर्तावर तिने नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे,माझं स्वत:चं हक्काचं घर... अनन्या पांडेने 2019 मध्ये 'स्टूडेंट ऑफ द इयर 2' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता करिअरच्या सुरुवातीलाच तिने मुंबईत स्वत:चं हक्काचं घर घेतलं आहे. वयाच्या 25 व्या वर्षी अनन्याने स्वत:चं घर घेतल्याने तिचं सर्वांना कौतुक आहे. वडिलांची मदत न घेता स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर तिने हे घर घेतलं आहे. पूजेदरम्यान अनन्याने सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान केला होता.