गुजरातमध्ये अतिशय दुर्मिळ रक्तगट असणारी देशातील पहिली आणि जगातील दहावी व्यक्ती असल्याचे समोर आले आहे.



साधारणपणे आपल्याला चार रक्तगट माहित असतात. यामध्ये ए, बी, ओ आणि एबी असे चार रक्तगट सर्वांनाच परिचयाचे आहेत.



मात्र, भारतातील डॉक्टरांना एक दुर्मिळ रक्तगट (Rare Blood Group) आढळून आला आहे. EMM Negative असा हा दुर्मिळ रक्तगट आहे.



गुजरातमध्ये ही दुर्मिळ रक्तगट असलेली व्यक्ती आढळली आहे. वय वर्ष 65 असलेल्या या व्यक्तीला हृदयविकाराचा आजार आहे.



मानवी शरीरात चार रक्तगट असतात. त्याशिवाय, शरीरात ए, बी, ओ, आएच आणि Duffy सारख्या 42 प्रकार असतात.



हा दुर्मिळ रक्तगट असल्याने या व्यक्ती इतरांना रक्तदान करू शकत नाही, अथवा त्यांना इतर रक्तगटांच्या व्यक्ती रक्त देऊ शकत नाही.