महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं (MSBSHSE) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC Result 2025) निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे.
राज्यातील बारावीचा निकाल (HSC Result 2025) उद्या (सोमवारी) 5 मे रोजी जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल (5 मे रोजी) दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करेल.
बारावीचा निकाल दुपारी 1 वाजता जाहीर होणार असून त्यापूर्वी 10 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावी निकालाच्या ठळक बाबी सांगितल्या जातील.
बारावीचे विद्यार्थी अधिकृत वेबसाईट https://mahresult.nic.in/ वरून गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहता येईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत झाली होती.
बारावीचा निकाल या वेबसाईटवर पाहता येईल https://results.digilocker.gov.in https://mahahsscboard.in, http://hscresult.mkcl.org
बारावीचा निकाल या वेबसाईटवर पाहता येईल https://results.targetpublications.org https://results.navneet.com
Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावी परीक्षा घेतली गेली.
बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालासाठी शुभेच्छा