आज सोमवार, 3 ऑक्टोबर, शारदीय नवरात्रीचा आठवा दिवस. शारदीय नवरात्रीच्या आठव्या दिवशी, देवीचे आठवे रूप महागौरीची पूजा केली जाते.



नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या आठव्या दिवसाला खूप महत्त्व आहे.



महागौरीने श्वेत रंगाचे वस्त्र आणि दागिने परिधान केले आहेत.  तिला चार हात आहेत आणि बैल तिचे वाहन आहे.



महागौरी हे देवी पार्वतीचेच एक रूप आहे. पौराणिक कथेनुसार, पार्वतीने भगवान महादेवांची कठोर तपस्या केल्यानंतर त्यांना पती म्हणून प्राप्त केले होते.



महागौरीच्या उपासनेने साधकाला धन, वैभव, सुख-समृद्धी प्राप्त होते.



महागौरीला प्रसन्न करण्यासाठी सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्रयंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा जप तुम्ही करू शकता.



पौराणिक कथेनुसार, त्यानंतर  देवी पार्वती महादेवांवर नाराज होऊन लांब जाऊन तपस्येसाठी बसते. जेव्हा महादेव पार्वतीला शोधतात तेव्हा ते आश्चर्यचकित होतात.



पार्वतीचा रंग, वस्त्र आणि अलंकार पाहून ते पार्वतीला गौर वर्णाचे वरदान देतात.



देवी महागौरी मंत्र: या देवी सर्वभू‍तेषु माँ गौरी रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:॥



अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन पूजेलाही विशेष महत्त्व आहे.