युझवेंद्र चहल सध्या आयपीएलमध्ये कमाल करत असून त्याची पत्नी धनश्री सोशल मीडियावर हवा करत आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटोज शेअर केले आहेत. यात ती पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. ती कायम पती युझवेंद्रसोबतही फोटोज शेअर करत असते. ती युझीसोबत रिल्सही करत असते. यंदा युझवेंद्र राजस्थान रॉयल्समध्ये असल्याने धनश्री त्यांचे सर्व सामने पाहायला मैदानात जाते. ती सोशल मीडियावरही कमाल अॅक्टिव्ह असते. पेशाने धनश्री कोरियोग्राफर आहे. तिने काही दिवसांपूर्वी बॉक्सिंग करतानाचे फोटोही शेअर केले होते. ती वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो शेअर करत असते.