2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भरपावसात केलेल्या भाषणाची मोठी चर्चा झाली होती.



त्यानंतर पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील एका कार्यक्रमात भरपावसात न थांबता भिजत भाषण सुरुच ठेवलं.



अशातच शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी काल सायंकाळी वडाळ्यात केलेले भाषणही चांगलंच चर्चेत आहे.



याचं कारण म्हणजे त्यांच्या भाषणाच्या वेळी देखील जोरदार पाऊस सुरु होता आणि या भरपावसात त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला.



राग येण्यापेक्षा दुःख वाटतंय. ज्यांना भरभरुन दिलं, त्यांनी पाठीत खंजीर खुपसला, असं आदित्य ठाकरे म्हणाले.



भर पावसातही शिवसैनिकांनी दिलेला प्रतिसाद आनंददायक होता, असं आदित्य ठाकरे म्हणाले.



विशेष म्हणजे शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत.



आदित्य ठाकरेंनी मुंबईतील आग्रीपाडा येथे आयोजित कार्यक्रमातही संवाद साधला.



निष्ठा यात्रेत आदित्य ठाकरे बंडखोर खासदार आणि आमदारांच्या मतदारसंघातील शिवसेना शाखांनाही भेट देत आहेत.