अभिनेत्री कतरिना कैफ नुकतीच बर्थडे साजरा करण्यासाठी पती विकी कौशल आणि कुटुंबासह मालदीवला गेली होती. या वेळी कतरिनासोबत तिची गर्ल गँगदेखील होती. आता कतरिनाने तिच्या बर्थडे ट्रीपमधील काही फोटो शेअर केले आहेत. वाढदिवसाच्या दिवशी कतरिना चाहत्यांना गुडन्यूज देणार अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. कतरिना कैफ गर्भवती असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु होती. अभिनेत्री तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ही गुडन्यूज चाहत्यांना देईल असे म्हटले जात होते. मात्र, अशी कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. आणि आता या चर्चेदरम्यान कतरिनाने स्वतःचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कतरिना खूपच सुंदर दिसत असून, या फोटोंमुळे ती गर्भवती असल्याचा चर्चांना देखील पूर्णविराम मिळाला आहे. या फोटोंमध्ये कतरिना खूपच सुंदर दिसत आहे.