चित्रकार सुमन दाभोलकरने नदीतल्या खडकावर साकारले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र. महापरिनिर्वाण दिवसाचे औचित्य साधत चित्रकार सुमन दाभोलकरने आंबेडकरांचे चित्र साकारले आहे. महामानवाला वंदन म्हणून एका विशाल खडकावर त्यांचं चित्र साकारण्यात आलं आहे. या चित्रासाठी सुमनने करड्या रंगसंगतीचा वापर केला आहे. एकीकडे महामानवाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची पावलं चैत्यभूमीकडे वळत आहेत. तर दुसरीकडे कलेच्या माध्यमातून महामानवाला वंदन केले जात आहे.