सध्या बहुतेक घरांमध्ये फ्रिज म्हणजेच रेफ्रिजेटर असतोच. दूध, भाज्या, फळे असे खाद्यपदार्थ साठवण्यासाठी फ्रिज आवश्यक आहे.
अनेक खाद्यपदार्थ असे असतात की, जे व्यवस्थित साठवले गेले नाही तर खराब होतात.
फ्रीजमधील थंड तापमानामुळे त्यात ठेवलेल्या वस्तू खराब होत नाहीत आणि दुर्गंधीही येत नाही.
दिवसभर सुरू असलेले रेफ्रिजरेटर वीज वाचवण्यासाठी रात्रीच्या वेळी ते बंद केले, तर काय होईल आणि किती वीज वाचेल?
फ्रीज बंद केल्यावर नंतर तो फक्त दोन ते तीन तास थंडपणा कायम ठेवू शकतो.
जर, तुम्ही रात्रभर किंवा पाच ते सहा तास फ्रिज बंद ठेवण्याचा विचार करत असाल तर यामध्ये तुमचंच नुकसान होईल.
रात्री रेफ्रिजरेटर बंद ठेवल्यास कमी थंडीमुळे आतील पदार्थ खराब होऊ शकतात.
फ्रीजच्या आत तापमान वाढल्यामुळे बुरशी येऊ शकते आणि बुरशीयुक्त अन्न खाल्ल्याने तुमचे आरोग्यही बिघडू शकते.
फ्रीज बंद ठेवल्याने विजेची थोडी बचत होऊ शकते. पण, ते तितकं फायदेशीर नाही.
रेफ्रिजरेटर बंद केल्यावर त्यातील तापमान वाढू लागते. तुम्ही काही वेळाने फ्रीज पुन्हा चालू केल्यास, कंप्रेसरला फ्रीज पुन्हा त्याच तापमानात थंड होण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो.
यामुळे फ्रिजच्या आतील भागांवरही परिणाम होऊ शकतो, यामुळे फ्रिजही खराब होण्याची शक्यता असते.